चिंच

जमिन/हवामान

मध्यम ते हलकी डोंगर उताराची व मध्यम खोल जमीन योग्य आहे. उष्ण व समशीतोष्ण हवामान चांगले मानवते.

अभिवृध्दीचा प्रकार

बियांपासून तसेच भेट कलम व शेंडा कलम पध्दतीने.

लागवडीचे अंतर

१० X १० मी. लागवडीसाठी १ X १ X १ मी. आकाराचे खड्डे खोदावेत.

शिफारशीत जाती 

प्रतिष्ठान, नंबर – २६३, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच.

झाडांची संख्या 

१०० प्रति हेक्टरी

खतांचे व्यवस्थापन 

खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत + पोयटा माती व १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १०० ग्रॅम यांच्या मिश्रणाने भरावा. पूर्ण वाढलेल्या झाडास ( ५ वर्षानंतर) ५० किलो शेणखत व ५०० : २५० : २५० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे.

विशेष माहिती

चिंच फळापासून शीतपेये, सरबते, सॉस तसेच पावडर तयार करता येते. चिंच रसाला परदेशी बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी आहे.

उत्पादन

सर्वसाधारणपणे १० वर्षापासून चांगले उत्पादन मिळते. ५० ते १५० किलो प्रति झाड

अकोला स्मृती या जातीची कलमे डॉ.पं.दे.कृ.वि अकोला येथे तर अजंठा गोड चिंचेची कलमे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, हिमायत बाग, औरंगाबाद येथे मिळतील.