जमीन –
हलकी ते मध्यम
जाती –
कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम
लागवडीचे अंतर –
७.० X ७.० मीटर
खते –
पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम
पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.
आंतरपिके –
आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ यासारखी आंतरपिके घेतल्यास प्रति हेक्टरी
उत्पादनामध्ये वाढ होते. या शिवाय या पिकात स्टायलो हेमॅटा या चारा पिकाची लागवड फायदेशीर
दिसून आली आहे.
उत्पादन –
७५ ते १२५ किलो / झाड (५ वर्षावरील झाड)
इतर महत्त्वाचे मुद्दे –
- लागवडीपूर्वी रोपांवर सुधारित वाणाचे कलम केले असल्याची खात्री करुन मगच लागवड करावी.
- भरपूर उत्पादन आणि अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आवळ्याच्या लागवडीसाठी कांचन वाणाबरोबर जास्त परागीभवनासाठी १० % कृष्णा या वाणाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
- पावसाळा लांबल्यास जून-जुलै महिन्यात फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे.
- पावसाचे पाणी जमीनीत मुरविण्यासाठी उताराच्या विरुध्द दिशेने बांध घालावेत किंवा झाडाच्या खोडाभोवती इंग्रजी (V) आकाराचे बांध घालावेत.
महत्वाच्या बातम्या –