Body Pain In Winter | हिवाळ्यामध्ये अंगदुखीच्या त्रासापासून मुक्त व्हायचे असेल?, तर करा ‘या’ गोष्टी

Body Pain In Winter | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. प्रामुख्याने हिवाळ्यात अंगदुखी (Body Pain In Winter) ची समस्या वाढायला लागते. बैठी जीवनशैली आणि शरीराच्या हालचालींच्या अभावामुळे या समस्या निर्माण होतात. या समस्या थंड हवामानात अजून वाढायला लागतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराच्या हालचाली करणे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे स्नायू कमकुवत होतात ,परिणामी तुमची अंगदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. त्यामुळे जर तुम्ही बसून काम करत असाल तर तुम्ही दर दोन तासाने पाच मिनिटे तरी शरीराच्या हालचाली केल्या पाहिजे. त्याचबरोबर हिवाळ्यात अंगदुखीच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकतात.

पोषक अन्नाचे सेवन करा

उन्हाळा आणि पावसाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यामध्ये व्यवस्थित आहार घेतल्यास तुमची अंगदुखीची समस्या कमी होऊ शकते. यामध्ये तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, कडधान्य, पालेभाज्या इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टींचे नियमित सेवन आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊन, तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर या ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी तुम्ही तेलकट आणि बाहेरील अन्न खाणे टाळले पाहिजे.

शरीर हायड्रेट ठेवा 

हिवाळा आला की लोक थंडीमुळे कमी पाणी पिऊ लागतात. कारण हिवाळ्यात थंडीमुळे जास्त पाणी पिल्याने पुन्हा-पुन्हा बाथरूमला जावे लागते. सारखे-सारखे बाथरूमला जाणे टाळण्यासाठी लोक हिवाळ्यामध्ये कमी पाण्याचे सेवन करू लागतात. पण शरीरात जेव्हा मुबलक प्रमाणात पाणी नसते तेव्हा अंगदुखी आणि थकवा यासारखे समस्या उद्भवायला लागतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी आणि अंगदुखीची समस्या नाहीशी करण्यासाठी तुम्ही मुबलक प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.

सप्लीमेंट्स घ्या

हिवाळ्यामध्ये हाडे आणि सांधेदुखीचा त्रास वाढत जातो. त्याचबरोबर हिवाळ्यात थंडीमुळे अंगदुखीची समस्या निर्माण होते. शरीरामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी ची कमतरता असल्यास हे त्रास उद्भवू लागतात. हे त्रास दूर करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्स देखील घेऊ शकतात. यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय कुठल्याही सप्लीमेंट सेवन करू नये.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या