बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा उद्रेक

कापसाचे बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा एकदा प्रकोप झाल्याने शेतकरी हादरले आहेत. सरासरी दोन वेचे झाल्यानंतरही कपाशीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर बोंड असून ही बोंडअळी आता सर्व कापसाचे पीक उद्ध्वस्त करण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती.

आता गोदावरी नदीचा पूर ओसरल्याने , येत्या तीन दिवसांत पंचनामे सादर करण्याचे आदेश

मात्र कापूस फुटण्याच्या काळातच या भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. मुळात परतीच्या पावसामुळे कपाशीवर फवारणी करणे गरजेचे होते. परंतु कापसाची वेचणी करायची की फवारणी करायची, या द्विधा मनस्थितीत शेतकऱ्यानी कापसाची वेचाई करणेच पसंत केले.

Hair Fall होतोय मग करा हा उपाय..

त्यामुळे फवारणी मागे पडली. परिणामी आठ दिवसांपूर्वी वणी तालुक्यात गुलाबी बोंडअळीने ‘दस्तक’ दिला. मागीलवर्षीदेखील याच काळात गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. यंदा दोन वेचापर्यंत अतिशय उत्तम प्रतिचा कापूस शेतकऱ्याच्या हाती आला. त्याला सीसीआयकडून भावही चांगला मिळाला. तोवर गुलाबी बोंडअळीचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होईल, या अपेक्षेत शेतकरी होता. परंतु आठ दिवसांपूर्वी बोंडअळीचा शिरकाव होऊन ही बोंडअळी वेगाने कपाशीवर अतिक्रमण करित असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.