Share

गाडीच्या विमा प्रीमियम मध्ये होणार वाढ !

गाडीच्या विमा (Insurance) प्रीमियम मध्ये होणार आहे वाढ वाहन-धारकांसाठी खिश्याला बसणार आणखी झळ.

साधारणपणे मोटार इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये दरवर्षी वाढ होत असते(It is increasing every year) पण गेल्या दोन वर्षांपासून मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ झालेली नव्हती मात्र यावर्षी यामध्ये ५ ते १० टक्के वाढ होणार असल्याने सर्वसामान्य वाहन धारकांच्या खिशाला नक्कीच झळ लागण्याची शक्यता आहे.

तसेच एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत मोटार विमा कंपन्यांनी ३.९ टक्के वाढ केली होती मात्र कोरोनापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही ५.१ टक्के कमी असल्याचे समजते.

हे आहे कारण ?

कोरोनामुळे वाहनांच्या विक्रीत घट आणि कमी प्रवास यामुळे वाहन विम्यांचे नुकसान झाले आहे . यामुळे मोटार विमा कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षात १.७ टक्के नुकसान झाले. असे बजाज अलियान्झ इन्शुरन्सचे मुख्य अधिकारी आदित्य शर्मा यांनी सांगितले याचबरोबर थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत, यामुळे इर्डानेही थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

दरम्यान देशातील २५ विमा कंपन्यांनी थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये १५ ते २० टक्के वाढीचा प्रस्ताव दिला.

महत्वाच्या बातम्या –

मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon