Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: खोबरेल तेल (Coconut Oil) जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. कारण खोबरेल तेल नियमित आपल्या केसांना लावल्याने केस निरोगी राहतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये अनेकजण त्वचेवर (Skin) खोबरेल तेल लावत असतात. हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते. या तेलाने त्वचेवरील अनेक समस्या देखील दूर होतात. खोबरेल तेल चेहऱ्यावर केव्हाही सहज पद्धतीने लावता येते. खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्यानंतर एक मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. असे केल्याने खोबरेल तेलाच्या मदतीने तुमच्या त्वचेवरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. हिवाळ्यामध्ये नियमित त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने पुढील फायदे मिळू शकतात.
त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो
हिवाळ्यामध्ये नियमितपणे त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने त्याच्यावरील कोरडेपणाची समस्या सहज दूर होऊ शकते. हिवाळ्यामध्ये अनेक वेळा त्वचेची झीज झाल्यामुळे चेहऱ्यावर अनेक समस्या निर्माण होतात. खोबरेल तेलाच्या वापराने त्वचेवरील झालेली झीज कमी होऊन, त्वचेला पोषण मिळते.
डाग कमी होतात
तुमच्या चेहऱ्यावर डाग आणि डागांची समस्या निर्माण झाली असेल, तर खोबरेल तेलाचा वापर आणि ती दूर होऊ शकते. खोबरेल तेलामध्ये आढळणारे गुणधर्म डाग आणि डागांशी निगडित समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर नियमित खोबरेल तेल त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार बनते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने एक मिनिट चेहऱ्यावर मसाज करू शकतात.
त्वचा चमकदार होते
तुम्हाला जर नैसर्गिक पद्धतीने त्वचा चमकदार बनवायची असेल, तर खोबरेल तेल तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. खोबरेल तेल नियमित चेहऱ्यावर लावून मसाज केल्याने तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | कारवाई झाली तरीही मोर्चा निघणार – छगन भुजबळ
- Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेला मुलायम बनवण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती मॉइश्चरायझर
- Kalicharan Maharaj | “डुकराच्या दाताचे पाणी मुलीला प्यायला द्या, मग बघा…”; कालीचरण महाराजांचं अजब वक्तव्य
- Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, अजित पवार म्हणाले…
- Amit Shah | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया; म्हणाले…