यंदा हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर गेलेला असतानाच गुरुवारी म्हणजेच ३० जानेवारी २०२० रोजी देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या चार पेट्या मुंबई बाजार समितीतील फळबाजारात दाखल झाल्या. देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पाच डझनांची एक पेटी दहा हजार रुपयांच्या जवळसपास आहे.
पृथ्वी मुद्राचे काय आहेत फायदे, घ्या जाणून…..
कोकणात यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला असून अद्याप मोहराचा पत्ता नाही. मात्र काही हापूस आंबा बागायतदार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अरविंद वाळके हे हापूस आंबा बागायतदार यशस्वी झाले आहेत. त्यांच्या हापूस आंब्यांना नोव्हेंबर महिन्यात मोहर आल्याने मध्यम व मोठ्या प्रकारचे हापूस आंबे तयार झाले आहेत.
शेती करताना जैवसाखळी जपली जावी, मिओरा यांचे वक्तव्य
या हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या चार पेट्या बाजार समितीतील व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे पाठविल्या.पाच डझनांच्या एका पेटीचा दर १० ते ११ हजार रुपये आहे. त्यामुळे सध्या एक हापूस आंबा १६६ रुपयांना पडणार आहे. तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल https://t.co/4AtaKAZ3Eq
— KrushiNama (@krushinama) February 1, 2020