Diabetes Tips | शुगर लेव्हल नियंत्रणात ठेण्यासाठी करा बदामाचे सेवन, जाणून घ्या रोज किती खावेत बदाम

टीम महाराष्ट्र देशा: रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबेटीस (Diabetes) होते. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या महान वैद्यांनी आपल्या संहितांमध्ये डायबेटीसवरील उपचार पद्धती नमूद केल्या आहेत. आपल्या शरीरात सतत पचनाच्या व इतर मेटाबॉलिक क्रिया घडत असतात. या क्रियांमध्ये इंसुलिन हा एक महत्वाचा पाचक रस आहे. मात्र शरीरातील इंसुलिनचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे शुगर होते. आयुर्वेदात अशा अनेक चिकित्सा आहेत ज्याद्वारे कुठलीही महागडी यंत्र न वापरता किंवा ऑपरेशन न करता यावर इलाज करता येतो. त्यापैकीच एक उपाय म्हणजे बदाम. बदामाच्या सेवनाने डायबिटीस नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

ड्रायफ्रूट्स प्रकारांमधील बदाम हे जवळजवळ सर्वांनाच आवडीचे असते. बदाम पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्याचबरोबर डायबिटीसच्या रुग्णांसाठी बदाम हा एक चांगला नाश्ता बनू शकतो. बदामामध्ये उपलब्ध असलेले मॅग्नेशियम मधुमेहासाठी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर नियमित बदामाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते. बदामाच्या सेवनाने डायबिटीसच्या रुग्णाचे आरोग्य सुधारू शकते. परिणामी हृदयविकाराचा धोका टळू शकतो.

डायबिटीस (Diabetes) रुग्णांनी दिवसात किती बदाम खावे?

बदामाचे सेवन करत असताना डायबिटीसच्या रुग्णांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की, बाजारात मिळणारे खारवलेले किंवा तळलेले बदाम त्यांनी खाऊ नये. त्याऐवजी डायबिटीस रुग्णांनी कच्चे बदाम खावे. मधुमेहाच्या टाईप 2 रुग्णांनी जेवणापूर्वी चार ते पाच तुकडे बदामाचे सेवन करावे. यामुळे रुग्णांची जेवणानंतरच्या ग्लुकोजची पातळी 30 टक्क्यांनी कमी होऊ शकते. त्याचबरोबर बदामाचे सेवनाने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होऊ शकते. त्याचबरोबर डायबिटीसचे रुग्ण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून दररोज पाच ते सहा बदाम खाऊ शकतात. त्याचबरोबर बदामाचे सेवन करत असताना तुमचे वजन वाढू नये म्हणून तुम्हाला तुमच्या एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी करावे लागेल.

आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज एक तास योगासने प्राणायाम आणि ध्यान केल्यास डायबिटीस वर नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर लवकर झोपणे लवकर उठणे या आयुर्वेदिक तत्त्वांचे पालन केल्यावर देखील डायबिटीसवर विजय मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर गुळवेल, कडुलिंब, जांभळाच्या बिया, कारल्याच्या बिया इत्यादी आयुर्वेदिक औषधींचे सेवन करून देखील मधुमेह संपुष्टात आणला जाऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या