घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱ्या लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपिठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे.
बौद्धिक विकासासाठी लोणी खूप फायदेशीर ठरते. तसेच रोजच्या आहारामध्ये मुलांना लोणी खायला दिल्याने मुलांची बौद्धिक पातळी वाढते. याच प्रमाणे नियमित लोणी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. लोणी खाल्ल्याने डोकदुखी त्रासांपासून आराम मिळतो.
तसेच लोणी फक्त शरीरासाठी चांगले नसून ते आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. लोणी पेस्ट त्वचेला लावल्याने त्वचेवर ग्लो येतो. त्वचा तजेलदार बनते. भारतीय महिलांमध्ये हीमोग्लोबिन प्रमाण काही प्रमाणात कमी आढळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. हीमोग्लोबिन संतुलित ठेवण्यासाठी लोणी फायदेशीर ठरते.
आजकालच्या लो फॅट आहाराच्या युगामध्ये लोणी खाण्याची सवयही लुप्त झाली आहे. आजकाल वैद्यक शास्त्रामध्येही लोणी खाण्याचे फायदे आणि तोट्यांबद्दल उलट सुलट चर्चा होत असतात. त्यामुळे लोणी खावे किंवा न खावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस
- पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
- चिंताजनक! जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ
- वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार – नितीन राऊत
- दिलासा: राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर