Dry Skin | हिवाळ्यामध्ये ‘या’ सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर

Dry Skin | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये त्वचेला कोरडेपणाच्या (Dry Skin) समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड हवामानामुळे त्वचेवर पुरळ आणि एनर्जी सारखे समस्या उद्भवतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये वृद्ध, थायरॉईड आणि शुगरने ग्रस्त असलेल्या लोकांना कोरडेपणाची समस्या जास्त त्रास देते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची त्वचा मुलायम आणि निरोगी ठेवण्यासाठी शैली मध्ये काही सवयींच्या समावेश करू शकतात.

हिवाळ्यामध्ये पुढील सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून (Dry Skin) दूर

हिवाळ्यामध्ये त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी करायचे असेल, तर तुम्ही त्वचेवर साबण ऐवजी सोप फ्री क्लिंजर वापरू  शकतात. कारण साबण त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते. त्यामुळे क्लिनरचा वापर केल्याने त्वचेवरील तेलाचा थर तसाच राहून, त्वचा मऊ होऊ शकते.

हिवाळ्यामध्ये तुम्हाला तुमची त्वचा मुलायम ठेवायची असेल, तर तुम्ही नियमितपणे मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही त्वचेला अधिक मऊ करण्यासाठी बॉडी लोशन ऐवजी हिवाळ्यात क्रीम वापरू शकतात. त्याचबरोबर तुम्ही हिवाळ्यात त्वचेवर तेलाचा देखील वापर करू शकतात. हिवाळ्यात आंघोळीपूर्वी तेल लावल्याने शरीरातील आर्द्रता टिकून राहते. परिणामी त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहते. यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल वापरू शकतात.

हिवाळ्यामध्ये प्रत्येकजण गरम पाण्याने अंघोळ करत असते. कारण गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेला आराम मिळतो. पण जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणापासून वाचवायचे असेल, तर कमीत कमी गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे.

शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता निर्माण झाली की, त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढू लागते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीराला जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी दिले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या