Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची (Dry Skin) समस्या खूप सामान्य आहे. हिवाळ्यामध्ये तापमानमध्ये बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचा खराब व्हायला लागते. त्याचबरोबर त्वचा जास्त कोरडी पडल्यामुळे खाज देखील सुटू शकते आणि अनेक वेळा त्यामुळे जखमा होतात. अशा परिस्थितीमध्ये कोरडेपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण अनेक महाग क्रीम वापरत असतो. पण महागडी क्रीम न वापरता तुम्ही काही घरगुती पद्धती वापरून देखील त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर करू शकता. त्याच घरगुती पद्धतीबद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

हिवाळ्यामध्ये तुम्ही गुलाब जल, ग्लिसरीन आणि लिंबू यांच्या मदतीने त्वचेवरील कोरडेपणा दूर करू शकता. विशेष म्हणजे या गोष्टींचा उपयोग केल्याने तुम्हाला त्याचा परिणाम रात्रभरातच दिसू लागू शकतो. त्याचबरोबर या गोष्टी आपल्या त्वचेसाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला एक चमचा ग्लिसरीनमध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये दोन चमचे गुलाब जल टाकावे लागेल. हे मिश्रण तुम्ही रात्रभर चेहरा हात आणि पायांवर लावून ठेवू शकता. त्यानंतर सकाळी हे मिश्रण आंघोळ करताना काढून टाका. नियमित हे मिश्रण त्वचेवर लावल्याने तुम्हाला त्याचा फरक जाणवायला लागेल. त्वचेवरील कोरडेपणाच्या समस्या सोबत या तिन्ही गोष्टींमुळे त्वचेला अनेक फायदे मिळतात.

गुलाब जल, ग्लिसरीन आणि लिंबू यांचे मिश्रण त्वचेला लावल्याने त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात. कारण गुलाब जलमध्ये बॅक्टेरियाशी लढण्यासाठी उपयुक्त असलेले घटक आढळून येतात. म्हणून त्याच्या वापरणे त्वचेवरील मुरुमांपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते. त्याचबरोबर गुलाब जल मध्ये लिंबू आणि ग्लिसरीन असल्यामुळे याचा प्रभाव अधिक होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर त्वचेच्या मुरुमांच्या समस्येला त्रस्त असाल तर तुम्ही या मिश्रणाचा वापर नक्की करावा.

लिंबू ,ग्लिसरीन आणि गुलाब जल या तिन्ही गोष्टींनी घरी सहज बनवलेल्या या फेस मास्कच्या मदतीने तुम्ही फक्त पिंपल्स आणि कोरडेपणा नाही तर चेहऱ्यावरील लालसरपणाच्या समस्या देखील दूर करू शकता. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी गुलाब जलचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. त्यामुळे गुलाब जल, लिंबू आणि ग्लिसरीन यांचे तयार केलेले मिश्रण नियमित चेहऱ्याला लावल्यास हिवाळ्यात तुमच्या त्वचेला गुलाबी चमक येऊ शकते.

सोप्या पद्धतीने तयार केलेला हा फेस पॅक लावून तुम्ही चेहऱ्यावरील तेलकटपणा देखील दूर करू शकता. तुम्ही जर त्याच्या तेलकटपणापासून त्रस्त असाल तर हा पॅक तुम्ही तुमच्या स्किन केअरच्या रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या