थंडीच्या दिवसात असा घ्या आहार

गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खाण्यात असावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा. हिवाऴ्यात कोमट पाणी पिल्याने, पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

तसेच हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मासाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली, तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात.

हिवाळ्याच्या सुरूवातीलाच एकदम जड पदार्थ खाऊ नये. आहार संतुलित ठेवावा. पूर्वी लोक श्रम जास्त करत होते. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीराकडून तेवढे श्रम होत नसल्यामुळे जास्त खाण्याची गरज नसते. एक लाडू, थोडसं तुप हे खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये एक अंड खायला हवं. सर्व डाळींचे डोसे, थालीपीठ खावे.

दरम्यान, हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पोटात तयार होणारी आम्लताही कमी करते.

महत्वाच्या बातम्या –