औरंगाबाद – औरंगाबाद परिमंडलात कृषिपंप (Agricultural pump) वीजबिल वसुलीस प्रतिसाद मिळत आहे. ज्या गावात वसुली, त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक गावे वसुलीसाठी पुढे येत आहेत. कृषी वीज धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शेतीच्या बांधावर, गावच्या पारावर मेळावे घेतले जात आहेत. धोरण पोहोचले असले तरी ‘बिल आज भरू, उद्या भरू’ असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता थोडेच दिवस उरले आहेत.,मानसिकतेमुळे एक वर्ष निघून गेले असून, आता फक्त ९९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. औरंगाबाद परिमंडलात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी ४ हजार ४६२ कोटींच्या घरात होती.
शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता अभियानात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची (Agricultural pump) थकबाकी तसेच चालू बिले भरून ५० टक्के माफी मिळवावी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन औरंगाबाद महावितरण परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे(Bhujang Khandare) यांनी केले आहे.
दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १८२० कोटी माफ झाले आहेत. तर सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी १२३१ कोटी अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६३९ कोटी असे मिळून फक्त १९६० कोटी भरायचे आहेत. या देय रकमेपोटी आतापर्यंत ५२ कोटी २१ लाखांचा भरणा वर्षभरात झालेला आहे. वसुलीचे हे प्रमाण केवळ २.६६ टक्के इतकेच आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या ३ लाख ५५ हजार ८४४ शेतकऱ्यांपैकी ८२ हजार ४३३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असला तरी केवळ ३ हजार १५४ शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे.
वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामात वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे. वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून आतापर्यंत २३९७ कृषी वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. ३ नवीन उपकेंद्रांची भर पडणार आहे. तसेच एका उपकेंद्रांची क्षमतावाढ होणार आहे. तसेच नवीन रोहित्रे उभारण्यासह त्यांची क्षमतावाढही केली जाणार आहे. योजनेचा लाभ घेऊन उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांची बिले भरली तर औरंगाबाद परिमंडलातील शेतकऱ्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीज देणे शक्य होईल.
महत्वाच्या बातम्या –
- आता घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ, जाणून घ्या
- मोठी बातमी – ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक
- आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार – राजेश टोपे
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १०० लाख क्विंटल साखर उत्पादन
- अभ्यासाला लागा! दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
- हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार – अजित पवार