कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. बाजारात शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला.

 खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

हिरव्या मिरचीची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये दर मिळाला. भरीताच्या वांग्यांची २७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपयांपर्यंत मिळाले. आल्याची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाला. बटाट्याची २४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते १९०० रुपये दर होता.भेंडीची २० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये मिळाला.

टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये मिळाला. कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर होता.