Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: आवळा (Amla) ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. आवळा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर आवळा आपल्या केसांसाठी (Hair Care) देखील खूप फायदेशीर असतो. आवळ्याच्या मदतीने तुम्ही केसांच्या समस्या दूर करू शकतात. त्याचबरोबर आवळा केस गळतीची समस्या देखील थांबवू शकतो. हिवाळ्यामध्ये तुम्ही जर केस गळण्याच्या समस्येला त्रस्त असाल, तर तुम्ही आवळ्याच्या मदतीने केसांवरील या समस्यांवर मात करू शकतात. कारण केसांना आवळा लावल्याने केस दीर्घकाळ निरोगी राहतात. त्याचबरोबर त्याने अवेळी पांढरे केस होण्याची समस्या ही दूर होते. आवळ्याच्या मदतीने केसांच्या समस्या दूर करण्यासाठी पुढील पद्धतीने केसांवर आवळा लावा.
1. केसांना निरोगी ठेवण्यासाठी आवळा खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला एक तास टाळूवर आणि केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला केस नियमित शाम्पूने केस धुवावे लागेल. पंधरा दिवसातून एकदा असे केल्याने तुमची केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर तुमची केस मजबूत होऊ शकतात.
2. आवळ्याचा उपयोग करून केस गळतीच्या समस्येवर मात करायचा असेल, तर तुम्हाला आवळा पावडर, शिकाकाई, लिंबाचा रस आणि दही यांचे मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. तुम्ही जर नियमित या मिश्रणाचा केसांवर वापर केला, तर तुमची केस गळतीची समस्या दूर होईल. त्याचबरोबर तुमचे केस काळे आणि निरोगी राहतील.
3. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आवळा पावडर आणि तुळशीची पाने बारीक करून त्याचे मिश्रण केसांना लावू शकतात. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस शाम्पूने धुवावे लागेल. आवळा पावडर आणि तुळशीची पाने बारीक करून नियमित केसांना लावल्यावर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | रोहित पवारांच्या बेळगाव दौऱ्यानंतर राऊतांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले, ”इच्छा आणि हिम्मत असली की…”
- Dry Skin | हिवाळ्यामध्ये ‘या’ सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर
- Sushma Andhare | ‘पुणे बंद बेकायदेशीर’ म्हणणाऱ्या सदावर्तेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- IND vs BAN 1st Test | बांगलादेशला मोठा धक्का! सामान्याआधी कर्णधार रुग्णालयात दाखल
- Devoleena Bhattacharya | ‘गोपी बहू’ला लागली हळद, देवोलीना भट्टाचार्य बांधणार लग्नगाठ?