Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ दालचिनीचे हेअरमास्क

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा सुरू होताच त्वचा (Skin) आणि केस (Hair) यांच्या विविध समस्या सुरू व्हायला लागतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये केसांना कोरडेपणाच्या (Dry Hair) समस्याला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर केस गळणे, केस तुटणे अशा अनेक समस्या हिवाळ्यामध्ये उद्भवतात. त्यामुळे अनेक लोक विविध प्रकारची उत्पादने वापरायला सुरुवात करतात. पण हे उत्पादन दीर्घकाळ केसांची निगा राखू शकत नाही. केसांची निगा राखण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक पद्धती वापरायला हव्या. कारण नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास केस निरोगी आणि चमकदार बनू शकतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून दालचिनीपासून नैसर्गिक पद्धतीने हेअरमास्क कसा तयार करायचा याबद्दल माहिती सांगणार आहोत. हे हेअर मास्क नियमत वापरल्याने केसांवरील अनेक समस्या दूर होऊ शकतात.

केसांची काळजी घेण्यासाठी पुढील हेयर मास्क (Hair Mask) वापरा 

दालचिनी आणि मध

दालचिनी आणि मध यांचा हेअर मास्क बनवून तुम्ही हिवाळ्यामध्ये केसांची निगा राहू शकतो. यासाठी तुम्हाला दोन टी स्पून दालचिनी, एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव ऑइल लागेल. हा हेयर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला हे सर्व साहित्य एकत्र करून घट्ट पेस्ट बनवून घ्यावी लागेल. यानंतर तुम्हाला तयार झालेली पेस्ट केसांमध्ये दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवल्यानंतर सामान्य पाण्याने केस धुवावे लागेल. नियमित या हेअर मास्कचा वापर केल्याने तुमचे केसांना मुलायमपणा येऊ लागेल.

दालचिनी आणि खोबरेल तेल

दालचिनी आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एक टी स्पून दालचिनी आणि एक टी स्पून खोबरेल तेल लागेल. हा हेयर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्याव्या लागतील. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला केसांना आणि टाळूवर लावून चांगली मसाज करून घ्यावी लागेल. हा मास्क लावल्यानंतर केसांवर अर्धा तास राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा. हा हेयर मास्क तुम्ही पंधरा दिवसातून एकदा लावू शकतात. खोबरेल तेल आणि दालचिनी यांचा हेरमास केसांना पोषण देऊन केसांच्या वाढीस मदत करेल.

दालचिनी आणि एरंडेल तेल

दालचिनी आणि एरंडेल तेल यांचा हेयर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला दोन टी स्पून दालचिनी, तीन चमचे एरंडेल तेल आणि चार-पाच थेंब एसेन्शियल ओईल लागेल. हा हेयर मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला या साहित्याचे घट्ट मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर हा हेयर मास्क केसांना किमान 30 मिनिटे लावून ठेवावा लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस साध्या पाण्याने धुवावे लागेल. हा हेयर मास्क नियमित लावल्याने तुमच्या केसांवरील कोरडेपणाची समस्या दूर होईल आणि केस गळती थांबण्यास देखील मदत होईल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या