Hair Care Tips | केसांची वाढ सुधारायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल केस गळणे (Hair Fall), केस खराब होणे (Hair Damage) ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. कारण आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहे. केस वाढीसाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा अवलंब करत असतो. कारण लांब केस असणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. परंतु खाण्यापिण्याच्या अभावामुळे आणि केसांची निगा व्यवस्थित न घेतल्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होत नाही.

तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये नियमित प्रोटीन युक्त पदार्थांचे सेवन करू लागला, तर तुमचे केस झपाट्याने वाढू शकतात. हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही अंड्याचे सेवन करू शकतात. नियमित अंड्याचे सेवन केल्याने तुमच्या केसांना भरपूर प्रोटीन मिळून केस मजबूत राहू शकतात. त्याचबरोबर अंडी खाल्ल्याने आरोग्याला देखील खूप फायदे मिळतात. केसांची वाढ वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश करू शकतात. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आहे उपलब्ध असते. शरीरात जर आवश्यक तितक्या प्रमाणात आयरन असले, तर केस तुटण्याची समस्या कमी होते.

आंबट पदार्थ केसांसाठी खूप चांगले असतात. आंबट पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. केसांच्या वाढीसाठी विटामिन सी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे दिवसभरात एका लिंबूचे किंवा संत्र्याचे सेवन करणे तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.

केसांची निगा राखण्यासाठी आणि केसांना मजबूत बनवण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असलेले अनेक केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरतात. पण बाजारामध्ये उपलब्ध असलेले हे महागडे उत्पादके अनेक वेळा आपल्या केसांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे तुम्ही हे प्रॉडक्ट न वापरता आहाराची व्यवस्थित रित्या काळजी घेऊन देखील तुमच्या केसांची निगा राखू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या