Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: केसांची निगा (Hair Care) राखण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करत असतात. कारण प्रत्येकालाच लांब-जाड, चमकदार आणि मऊ केस हवे असतात. पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहाराच्या सवयीमुळे अनेकांना केसांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादके वापरतात. परंतु, या उत्पादकांमुळे केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर या रसायनुक्त उत्पादकांचा परिणाम आपल्या केसांवर जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. नैसर्गिक पद्धतीने केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकतात. दही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण दह्यामध्ये विटामिन बी 5, विटामिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळतात. त्यामुळे दही लावल्याने केसातील कोंडा (Hair Dandruff), कोरडे केस (Dry Hair), केस गळती (Hair Fall) इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर दह्यात काही गोष्टी मिसळून लावल्याने केस अधिक चांगले आणि निरोगी राहू शकतात.
दह्यामध्ये पुढील गोष्टी मिसळून केसांना निगा (Hair Care) राखली जाऊ शकते
दही आणि मेथी दाणे
जर तुम्ही केसांमध्ये झालेल्या कोंड्यापासून त्रस्त असाल, तर दही आणि मेथी दाणे तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर दह्यामध्ये मेथीदाणे मिसळून लावल्यास केस गळतीची समस्या कमी होऊन केसांची वाढ व्हायला लागते. दही आणि मेथी दाणे केसांना लावण्यासाठी तुम्हाला दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागतील. सकाळी भिजवून ठेवलेले दाणे तुम्हाला बारीक करून घेऊन एक वाटी दह्यामध्ये मिक्स करून घ्यावे लागेल. तुम्ही ही पेस्ट केसांना आणि टाळावर मसाज करून लावू शकतात. ही पेस्ट केसांवर अर्धा तास ठेवून तुम्हाला कोमट पाण्याने तुमची केस घ्यावे लागेल. त्यांना नियमित मेथी दाणे आणि दही लावल्यास तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.
दही आणि मध
मधामध्ये अँटीबॅक्टरियल, अँटी-फंगल आणि अँटी-अँक्सीडेंट गुणधर्म उपलब्ध प्रमाणात आढळतात. हे गुणधर्म टाळूवर साचलेली घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित दही आणि मध यांचे मिश्रण केसांना लावल्याने केस गळतीची समस्या कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक वाटी दही घेऊन त्यामध्ये एक चमचा मध मिसळावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला पंधरा मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर केस नियमित शाम्पूने सामान्य पाण्याने धुवा. दही आणि मध यांच्या मिश्रणाने केस चमकदार आणि निरोगी राहू शकतात.
दही आणि ऑलिव्ह ऑइल
दही आणि ऑलिव्ह ऑइल यांचे मिश्रण केसांच्या अनेक समस्या दूर करू शकतात. कारण ऑलिव्ह ऑइलमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ए, विटामिन ई आणि अँटीअँक्सीडेंट गुणधर्म जातात. हे गुणधर्म केसांना पोषण देण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक वाटी दह्यामध्ये साधारण एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्यावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला सुमारे वीस मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस साध्या पाण्याने धुवावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुमचे केस चमकदार आणि मजबूत होऊ शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh | मोठी बातमी! अनिल देशमुखांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर
- IND vs AUS | भारतीय महिला क्रिकेट मधील अविस्मरणीय क्षण, व्हायरल झाली विक्ट्री क्लीप
- Shahrukh Khan | ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी किंग खान पोहोचला माता वैष्णोदेवीच्या दारात
- World Test Championship | ICC ने ‘या’ चॅनलला दिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप प्रसारणाची जबाबदारी
- Rajinikanth | बस कंडक्टर ते थालाइवा कसा होता रजनीकांतचा प्रवास?, जाणून घ्या