Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्याची चाहूल लागताच अनेक आरोग्याच्या (Health) समस्या निर्माण व्हायला लागतात. कारण हिवाळ्यामध्ये हवेतील थंडपणामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार उद्भवतात. अशा परिस्थितीमध्ये हंगामी आजारापासून आराम मिळवण्यासाठी घरातील वडीलधारी मंडळी तूप खाण्याचे सल्ला देतात. कारण तुपामध्ये अनेक पोषक घटक उपलब्ध असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करून संसर्गजन्य रोगापासून आपले संरक्षण करू शकतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या कोमट पाण्यात तूप मिसळून आंघोळ केल्याने शरीराला देखील अनेक फायदे मिळू शकतात. हिवाळ्यामध्ये कोमट पाण्यात तूप मिसळून आंघोळ केल्यास शरीराला पुढील फायदे मिळू शकतात.
डोकेदुखी दूर होते
हिवाळ्यामध्ये कोमट पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते. थंडीच्या मोसमत थंड वाऱ्यामुळे डोके दुखायची समस्या सामान्य होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तूप टाकून आंघोळ केल्यास तुम्हाला डोकेदुखी पासून आराम मिळू शकतो.
त्वचा मऊ होते
हिवाळ्यात वाढत्या थंडीमुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढत जाते. त्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी लोशन आणि मॉइश्चरायझर वापरत असतात. पण या थंडीमध्ये तुम्ही तुमच्या आंघोळीच्या कोमट पाण्यात तूप मिसळून आंघोळ केल्याने तुमच्या त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते.
रक्ताभिसरण सुधारते
हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा तूप मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. कारण तूप मिसळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान सुधारू शकते आणि शरीर आतून तणावमुक्त राहू शकते. ज्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Shambhuraj Desai | “संजय राऊत तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ..”; शंभूराज देसाईंची सडकून टीका
- Akshay Kumar | अक्षय कुमारच्या छत्रपतींच्या भूमिकेला नेटकऱ्यांचा विरोध, म्हणाले…
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Udyanaraje Bhosale | “प्रत्येकाची बुद्धी…”; ‘त्या’ वक्तव्यावरून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार
- Sanjay Raut | “दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला शक्य नाही”; संजय राऊतांचे गंभीर आरोप