Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: सुके मेवे (Dry Fruits) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर उत्कृष्ट चवीमुळे अनेकांना आपल्या दिवसाची सुरुवात सुक्या मेव्याने करायला आवडते. विशेषतः फिटनेस प्रेमी लोक सकाळी चहा ऐवजी रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स खातात. कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. सकाळी खाल्ल्या जाणाऱ्या ड्रायफूट्समध्ये सर्वात सामान्य ड्रायफ्रूट म्हणजे मनुका. सकाळी रिकाम्या पोटी मनुका  खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही सकाळी मनुका आणि मध यांचे सेवन केले तर तुम्हाला खूप आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. कारण या दोन्हींमध्ये भरपूर औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने आरोग्याला खूप फायदे मिळू शकतात. मध आणि मनुका यांचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने पुढील आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

पोट निरोगी राहते

मनुक्यामध्ये आवश्यक तितक्या प्रमाणात फायबर उपलब्ध असते. मध शरीरात होणाऱ्या जळजळीशी लढण्यास मदत करतो. त्याचबरोबर नियमित सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका यांचे सेवन केल्याने पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाशी संबंधित इतर आजार देखील कमी होऊ शकतात. त्याचबरोबर सकाळी आतड्यांची हालचाल कमी करण्यासाठी आणि पोटांच्या समस्या टाळण्यासाठी नियमित मध आणि मनुक्याचे सेवन केले पाहिजे.

रक्ताची कमतरता पूर्ण होते

मध आणि मनुका या दोन्हीमध्ये विटामिन सी आणि आयरन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. हे दोन्ही गुणधर्म शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी नियमित मध आणि मनुका यांचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमी झालेली पातळी वाढू शकते. त्याचबरोबर नियमित मध आणि मनुक्याचे सेवन करणे ॲनिमियाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हाडे आणि दात मजबूत होतात

मनुका आणि मध या दोन्ही गोष्टी कॅल्शियम आणि इतर औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे नियमित यांचे सेवन केल्याने तोंडाच्या समस्या कमी होतात. या दोन्ही गोष्टी तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून दात मजबूत करण्यास मदत करतात. त्याचबरोबर नियमित यांच्या सेवनाने सांधेदुखीची समस्या कमी होऊन हाडे मजबूत होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या