Health Tips | थंडीमध्ये पचनाचा त्रास होत असेल, तर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये मिरची, मसाले आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य (Health) आणि पचनक्रिया बिघडू शकते. पचनक्रिया बिघडल्यावर गॅस, पोटदुखी, अपचन, ऍसिडिटी इत्यादी समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करत असतात. यावर वेगवेगळे उपाय न करता तुम्ही फक्त आयुर्वेदाची मदत घेऊन या समस्या दूर करू शकतात. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात मिळणाऱ्या हंगामी भाज्यांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने गाजर, रताळे इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर तुम्ही हिवाळ्यामध्ये मेथी, पालक इत्यादी पालेभाज्यांचे देखील सेवन करू शकतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा आहारात समावेश करू शकतात.

तुप

हिवाळ्यामध्ये पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर तूप हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यास देखील मदत करते. शरीरातील आतड्यांना निरोगी ठेवण्यासाठी तुपाची सेवन फायदेशीर मानले जाते. दररोज एक चमचा तुपाचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

आवळा

हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर आवळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी हे गुणधर्म आढळतात. त्यामुळे जर तुम्ही हिवाळ्यामध्ये दररोज एका आवळ्याचे सेवन केले तर तुमच्या पचन संस्थेची संबंधित समस्या कमी होऊ शकतात. हिवाळ्यामध्ये तुम्ही कच्चा आवळा त्याचबरोबर आवळ्याच्या मुरब्बाचे सेवन करू शकतात.

अंजीर

हिवाळ्यामध्ये नियमित अंजीर खाल्ल्याने शरीरातील मेटाबोलिझम सुधारते. त्याचबरोबर शरीराला उबदार ठेवण्यासाठी देखील अंजिराचे सेवन केले जाते. या बदलत्या वातावरणामध्ये तुम्ही दररोज दोन ते तीन अंजीर दुधासोबत खाऊ शकतात. नियमित अंजिराचे सेवन केल्याने तुमची ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

गुळ

गुळामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि प्रोटिन्स इत्यादी घटकांचा समावेश होतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये नियमित गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी डॉक्टरही मर्यादित प्रमाणात गुळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या