Health Tips | हिवाळ्यामध्ये 10 मिनिटे उन्हात बसल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला उन्हापासून (Sun) दूर राहावे वाटते, पण हिवाळ्यामध्ये प्रत्येकाला ऊन हवेहवेसे वाटते. कारण हिवाळ्यामध्ये ऊन आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असते. हिवाळ्यामध्ये फक्त दररोज दहा मिनिटे उन्हात बसून शरीराला पुरेसे विटामिन डी मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या काळात आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस सकाळच्या सूर्यप्रकाशात बसल्याने आपले शरीर निरोगी राहू शकते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये सकाळचे ऊन घेतल्याने आपल्या मेंदूलाही फायदा होतो. हिवाळ्यामध्ये उन्हात दहा मिनिटे बसणे, तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

तणाव कमी होतो

हिवाळ्यामध्ये सकाळी दहा मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसल्यावर शरीरातून मेलाटोनिन हार्मोन्स बाहेर निघतात. परिणामी तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागू शकते. त्याचबरोबर सूर्यकिरणे सेरोटोनिन शोषून घेतात त्यामुळे आपण आनंदी राहतो. त्याचबरोबर पुरेशी झोप घेतल्याने तणाव देखील कमी होतो.

नैराश्य कमी होते

नियमित उन्हात बसल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात विटामिन डी मिळते. विटामिन डी च्या कमतरतेमुळे मेंदूचा विकास योग्यरित्या होत नाही. त्यामुळे विटामिन डी ची कमतरता असल्यामुळे प्रौढांमध्ये नैराश्याची क्षमता वाढते. अनेक मेडिकल रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, दररोज दहा मिनिटे उन्हात बसल्याने नैराश्याची लक्षणे कमी होऊ शकतात.

विचार करण्याची क्षमता वाढते

हिवाळ्यामध्ये दररोज सकाळच्या सूर्यप्रकाशात बसल्याने मेंदूच्या पेशी सक्रिय होतात. परिणामी मेंदू निरोगी राहून संतुलित पद्धतीने काम करायला लागतो. कोणत्याही व्यक्तीच्या मेंदूच्या पेशी सक्रिय झाल्यावर विचार करण्याची क्षमता वाढू लागते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या