नारळ सुकलेला असो किंवा ओला तो खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. नारळ खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. नारळातून अनेक पोषक तत्वे मिळतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात.नारळामध्ये विविध एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने एन्झाईम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश करता येईल. या शिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात.नारळाच्या दूधामध्ये मॅनिटॉल नावाची साखर, डिंक, अल्ब्युमिन नावाची प्रथिने, टार्टारिक एसिड आणि पाणी असते.नारळाच्या तेलामधे कॅप्रॉलिक एसिडशिवाय लॉरिक, मायरिस्टीक, पामिटिक, आणि स्टीयरिक आम्लाचे ग्लिसराईड्स असतात. चला तर जाणून घेऊ फायदे…
कांदा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- सुका नारळ खाल्यामुळे तुमची स्मरण शक्ती वाढते व आपल्या हृदयाला देखील फायदेशीर असते.
- नारळ आणि केस हे एक महत्वपूर्ण समीकरण आहे. आपण केस काळभोर व दाट होण्यासाठी केसांना खोबरेल तेल लावतो.
- जर तुमच्या हाडातून उठता -बसता कट -कट आवाज येत असेल तर तुम्ही नक्की सुका नारळ खा
तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?
- ज्या लोकांना डोके दुखीचा त्रास होते अशा लोकांनी सुके नारळाचे तुकडे जरूर खावे.
- पदार्थाची चव वाढविण्यासाठी देखील सुके खोबरे खूप उपयुक्त असतात त्यामुळे पदार्थला एक वेगळीच चव येते.
- ऍनेमिया या आज़ारासाठी नारळ खूप उपयुक्त ठरतो. यामध्ये असे पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.नारळामुळे रक्त वाढण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –