धूळ, प्रदूषण, ऊन या सगळ्यामुळे त्वचा कळवंटे. आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती टिप्स जाणून घेऊ या. त्वचेचा रंग उजळविण्यासाठी त्वचा चांगल्या पद्धतीने कशी तेजस्वी करता येईल यांनी माहिती घेऊ या. तांदळाचं पीठ त्वचेचा रंग उजळविण्यासाठी फायदेशीर ठरतो. तांदळाचं पीठ, धूळ, प्रदूषण, उन्हापासून त्वचेला झालेल्या नुकसनापासून बचाव करण्यास मदत करत.
तांदळाच्या पिठात नारळाचं दुध, मध घालून हे मिश्रण चेहऱ्याला लाऊन १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचा तेजस्वी होईल. तसेच चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जाईल. याच प्रमाणे तेजस्वी त्वेचेसाठी द्राक्षे देखील खूप फायदेशीर असतात. द्राक्षे नियमित रोज खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा उजळते आणि मऊ पडते.
दरम्यान, त्वचेच्या सर्वच समस्यांवर पपई अतिशय फायदेशीर ठरते. पिकलेल्या पपईचा गर कडून चेहऱ्याला लाऊन मसाज केल्याने काळे डाग, काळपटपणा निघून जातो. १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी! ‘या’ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल ५० टक्क्यांनी घट
- राज्यात अधिक कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही – उद्धव ठाकरे
- राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलं ‘हे’ आवाहन
- मोठी बातमी – महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरु, काय बंद राहणार?
- ‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या
- अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई