Immunity Booster | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन ही जवळजवळ प्रत्येकाची समस्या बनते. त्यामुळे थंडीमध्ये सतर्क राहण्याची प्रत्येकाला गरज असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारशक्ती (Immunity System) मजबूत ठेवणे देखील खूप महत्त्वाचे असतात. कारण जेव्हा रोगप्रतिकारशक्ती मजबूत असेल, तेव्हाच तुम्ही मोसमी आजारांपासून लढू शकतात. म्हणूनच आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या बदलत्या वातावरणात तुम्हाला जर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश केला पाहिजे.
तीळ
या बदलत्या हवामानामध्ये तीळ तुमच्या श्वसनक्रियेमधील समस्यांना मात देऊ शकतो. तिळाच्या लाडूचे नियमित सेवन केल्याने हिवाळ्यामध्ये तुमच्या शरीराला उब देखील मिळू शकतो. कारण तीळ हे गरम असतात. त्यामुळे तिळाच्या नियमित सेवनाने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.
तुळस आणि आले
तुळस आणि आल्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीबॅक्टरियल आणि अँटिव्हायरल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म सर्दी, खोकल्याला कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना वाढू देत नाही. त्याचबरोबर तुम्ही दिवसाची सुरुवात चहाने करत असाल, तर चहामध्ये तुळशी आणि आले टाकून चहा बनवल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.
तुप
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुपामुळे तर कॅलरीज वाढतात. पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने खराब चरबी कमी होऊन शरीराला उब मिळण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात नियमित तुपाचे सेवन केल्याने तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहू शकता.
गुळ
या हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गुळाचा समावेश केला पाहिजे. गुळ तुमच्या शरीराला थंडीपासून तर वाचवतोच, पण त्याचबरोबर गुळाच्या नियमित सेवाने पचनक्रिया देखील सुधारते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Balasaheb Thorat | “…तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहाटीला पर्यटन करत होते”; सीमावादावरून बाळासाहेब थोरात यांची सडकून टीका
- Sanjay Raut | “ही सरळ सरळ धमकी समजायची काय?”; शंभूराज देसाईंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा सवाल
- Eknath Shinde | “48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार?”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा शरद पवारांना सवाल
- Supriya Sule | लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; नेमकं घडलं काय?
- Raj Thackeray | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि…”; राज ठाकरेंचा इशारा काय?