महत्वाची बातमी – शेततळ्यांना मिळणार ५२ कोटींचे अनुदान

शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. शेतात तळे करुन त्यात भूपृष्ठावरुन वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनास करणे हा होय. या तळ्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक येते.

सरकारने काही योजना आणल्या आहेत. यासाठी मागेल त्याला शेततळे ही सुद्धा एक योजना सरकारने आणलेली आहे. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे बांधण्याचे अवाहन केले, पण या अनुदानाची रक्कमच राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती.  राज्यातील शेतकरी गेल्या 4 ते 5 वर्षापासून या शेततळ्याच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत होते. नाशिक जिल्ह्यापासून या शेततळ्यासाठी अनुदान देण्याची संकल्पन सुरू झाली. २००९मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खानदेश विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार फक्त नंदूरबार जिल्ह्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून ४०० शेततळी खोदण्याचा निर्णय घेतला होता.

माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  २०१६मध्ये आणलेली ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना चांगलीच कारणीभूत ठरली. या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमुळे  किमान ६० गुंठे जागा असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू लागले. सुरुवातीला ही योजना ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांसाठी होती. पुढे मात्र या योजनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला गेला.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजेनसाठी २०१६पासून राज्यातील  शेतकऱ्यांनी शेततळी खोदण्यास सुरुवात केली. मात्र,अनुदान वाटपात फडणवीस सरकारकडून दिरंगाई होऊ लागली. रखडलेल्या अनुदानापोटी राज्य सरकारने तब्बल 52 कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून रखडलेले अनुदान अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. याकिरता स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी आमदारांकडे या अनुदानाच्या रकमेची मागणी केली होती. तर कृषी आयुक्तांकडेही शेतकरी हे पाठपुरावा करीत होते. त्यानुसार कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीही पाठपुरावा केल्याने अनुदनाची रक्कम मिळालेली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केली जाणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

राज्यातील तब्बल 10744 शेतकऱ्यांना मिळणार अनुदानाचा लाभ

तर आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची  बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी  रेटा आणि कृषी आयुक्तांनी घेतलेली भूमिका अतिशय निर्णायक ठरलेली आहे.राज्य सरकारने   शेततळ्यांसाठी  तब्बल 52 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. सरकारच्या या मटावच्या घोषणेमुळे राज्यातील 10 हजार 744 शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान मिळणार आहे.  कारण शेततळ्यांसाठी राज्य सरकारने तब्बल 52 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील 10 हजार 744 शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –