अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. काकडीची २०८ क्विंटलची आवक झाला. काकडीला ६०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.

बटाट्याची ३८७६ क्विंटलची आवक झाली. एक हजार ते दोन हजार रुपयांचा दर मिळाला. घेवड्याची ३५ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. शिमला मिरचीची १२८ क्विंटलची आवक झाली आणि प्रती क्विंटलला २००० ते २२०० रुपयांचा दर मिळाला. कोथिंबीर, पालक, मेथी, वाटाणा, डांगरलाही चांगली मागणी राहिली.

भुसारमध्ये बाजरीची ५०७ क्विंटलची आवक झाली आणि १७११ ते २५०० रुपयाचा दर मिळाला. गावरान ज्वारीची १२१ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. तुरीची २६० क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला.लाल मिरचीची ५९४ क्विंटलची आवक होऊन ५१९० ते १७०५० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची २८५ क्विंटलची आवक झाली. ३४०० ते ४२२५ रुपयांचा दर मिळाला. तर, ४७५ क्विंटल गुळडागाची आवक झाली. २७७५ ते ४५०० रुपयांचा दर मिळाला. मठाची ७ क्विंटलची आवक झाली आणि ७७०० रुपयांचा दर मिळाला. गव्हाची १७० क्विंटलची आवक झाली.