टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये हवामान थंड आणि जेवढे आल्हाददायक असते, तेवढाच या ऋतूमध्ये आजाराचा धोका जास्त असतो. हिवाळा आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) सोबत घेऊन येतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये किवी (Kiwi Fruit) चे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण कीविला विटामिन सी चे भांडार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे किवीच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. त्याचबरोबर मोसमी आजारांपासून देखील सुटका मिळू शकते. किवीमध्ये विटामिन ई, विटामिन के, फायबर, कॅरोटीनाईड इत्यादी पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे किवी खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदे मिळू शकतात. हिवाळ्यामध्ये नियमित किवीचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात
पचनक्रिया सुधारते
हिवाळ्यामध्ये पचनाच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीमध्ये किवीचे नियमित सेवन केल्याने तुमची पचनक्रिया सुधारू शकते. कारण किवीमध्ये फायबर उपलब्ध असते. जे पचनक्रिया आणि अपचन यासारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
किवी या फळांमध्ये विटामिन सी आणि अँटीअँक्सीडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे जर हिवाळ्यामध्ये तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर तुम्ही नियमितपणे किवीचे सेवन केले पाहिजे. कारण रोगप्रतिकारशक्ती वाढल्यावर तुम्ही मोसमी आजारांपासून आणि बॅक्टेरिया पासून सुरक्षित राहू शकतात.
सांधेदुखी कमी होते
हिवाळ्यात वाढत्या थंडीमुळे सांधेदुखीचा त्रास वाढू लागतो. त्यामुळे तुम्ही जर हिवाळ्यात नियमित रोज एक किवी खाल्ले तर तुम्ही सांधेदुखीपासून दूर राहू शकतात. कारण किवीमध्ये अँटीइम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
त्वचा निरोगी ठेवते
हिवाळ्यामध्ये त्वचेला अनेक समस्यांना झुंज द्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये त्वचा कोरडी होऊन त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत विटामिन सी आणि विटामिन ई ने समृद्ध असलेल्या किवी फळाचे सेवन करून त्वचेवरील समस्या दूर करता येऊ शकतात. त्याचबरोबर हिवाळ्यात रोज एक किवी खाल्ल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | “देवेंद्रभाऊ करे तो रासलीला, हम करे तो…”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला
- Kriti Sanon | कृती आणि प्रभास करताय एकमेकांना डेट?, वरुण धवनने केला खुलासा
- Ruturaj Gaikwad | एका ओव्हरमध्ये 7 छक्के मारत ऋतुराजने रचला इतिहास
- MSRTC Ricruitment | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू
- Suryakumar Yadav | विराट कोहलीसोबत सामना झाल्यास कोण जिंकणार?, प्रश्नावर सूर्याने दिले मजेशीर उत्तर