पालेभाज्या आणि त्याचे फायदे

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.

मेथी : (शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecumट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते.

पालक :  पचनसंस्था आणि मूत्रसंस्था यांच्या आतील सूज कमी करुन मऊपणा आणण्यास उपयुक्त आहे. दमा आणि खोकला कमी करणारी ही भाजी आहे.

तांदूळजा : बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी असते.

शेपू : यास बाळंतसोप असेही नाव आहे.ही स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफ व वायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग तहान अतिसार यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.

कडूलिंब  :  पित्तनाशक आणि कृमीनाशक म्हणून याचा उपयोग.

कोथिंबीर :  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक आहे. हृदरोगावर अतिशय उपयुक्त.

अळू : अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात. अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.