जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या आणणारी असते.
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं – बच्चू कडू
जांभळाचे आरोग्यदायी फायदे…
- जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते.
- जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो.
- जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यांसारख्या आजारात ती फायदेशीर ठरते.
- पांडुरोग व कावीळ झालेल्या रुग्णांसाठी जांभळं हितावह असतात.
- जांभळाच्या रसामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. पण ते वातकारक असल्याने जपून खावे.
- उन्हाने उष्णतेचा त्रास होत असल्यास जांभूळ खाल्ल्यावर तरतरी येते.
- जांभळाच्या झाडाच्या सालीची राख ही दातांसाठी चांगली असते.
महत्वाच्या बातम्या –
कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक , जाणून घ्या फायदे
आदिवासींच्या विकासाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – प्राजक्त तनपुरे