रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. चला जाणून घेऊ उपयोग…
- रुईचा चीक उकळून घट्ट केल्यास गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ बनतो. या चिकाचा रबर बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
- रुईच्या झाडाचे आणि पानांचे खत वाळवीचा नाश करणारे आहे.
- रुईच्या झाडाला येणार्या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस निघतो. ‘रुईचा कापूस सावरीच्या (एक प्रकारचे झाड) कापसापेक्षाही थंड असतो’, असे म्हणतात.
- ‘रुईच्या झाडाच्या सालीचे तंतू काढून त्याचे दोर बनवतात. झाडे कापून आणून त्यांना १ – २ वेळा ऊन द्यावे. असे केल्याने त्यांच्यावरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून स्वच्छ धुवावी. असे केल्याने ती पांढरी होते. नंतर तिचे बारीक बारीक धागे मोकळे करावेत. हेच याचे सूत. या सुताचे दोर पाण्यात लवकर कुजत नाहीत. त्यामुळे मासे धरण्याच्या गळासाठी हे सूत वापरतात.
- रुईच्या सालीच्या आतील भागाचा कागद बनवण्यासाठी उपयोग करतात.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- दिवाळीत पावसाची शक्यता, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार
- दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे
- जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
- एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ