चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota,असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae)हे आहे . चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात.
लागवड तंत्र
लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात करावी. नवीन बागेची लागवड करण्यापूर्वी जमिनीची नांगरणी व कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
१० बाय १० मीटर अंतरावर एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचे खड्डे करावे. पोयटा माती, २ ते ३ घमेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पावडर २०० ग्रॅम या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत.
प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी कलमाचा जोड जमिनीच्या वर राहील या पद्धतीने कलम लावावे. कलमाला काठीचा आधार द्यावा. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.
वळण आणि छाटणी
झाडाची नियमित छाटणी करावी लागत नाही. मात्र सुरवातीच्या काळात खिरणी खुंटावर येणारी फूट तसेच झाडाच्या खोडावर जमिनीपासून ५० सें.मी. उंचीपर्यंत येणारी नवीन फूट वेळोवेळी काढून टाकावी. झाडाला योग्य आकार देण्यासाठी आवश्यकतेनुसार छाटणी करावी.
खते आणि पाणी व्यवस्थापन
- झाडाची जलद वाढ होण्यासाठी खताच्या मात्रा दोन समान हप्त्यात सप्टेंबर आणि जून या महिन्यांत विभागून द्याव्यात. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना १०० किलो शेणखत, तीन किलो नत्र, दोन किलो स्फुरद व दोन किलो पालाश द्यावे.
- झाडाची चांगली वाढ आणि त्यापासून भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी पाण्याच्या नियमित पाळ्या द्याव्यात.
- फुलोरा धरण्याच्या काळात तसेच फलधारणेच्या अवस्थेत चिकूच्या झाडाला पाण्याचा ताण पडल्यास फळांचा आकार लहान राहतो.
आंतरपिके
- चिकूचे झाड सावकाश वाढणारे असल्यामुळे त्यामध्ये पहिले ५ ते ६ वर्षांच्या काळात आंतरपिके घ्यावीत.
- टोमॅटो, कोबी, वांगी, मिरची, लिली, निशिगंध या आंतरपिकांची लागवड फायदेशीर ठरते.
फळांचे उत्पादन
फुलांचा पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये येतो. फुलांचा दुसरा बहार फेब्रुवारी-मार्च मध्ये येतो. साधारणपणे फुले आल्यानंतर फळधारणा होवून फळे पक्व होण्यासाठी २४० ते २७० दिवसांचा कालावधी लागतो.
जाती
- कालीपत्ती, क्रिकेट बॉल, किर्ती-भारती, को-१, पिलीपत्ती, बारमाशी, पीकेएम-७, पीकेएम-२
- कालीपत्ती ही लोकप्रिय जात आहे. कालीपत्तीची झाडे मोठी, विस्तारित असतात. पाने गर्द हिरवी असतात. फळे मोठी अंडाकृती आहेत. गर गोड आहे. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून दरवर्षी ३००० ते ४००० फळे मिळतात.
महत्वाच्या बातम्या –
लातूरमध्ये जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे आज पाणी परिषदेचे आयोजन https://t.co/qzR5vqmbOx
— KrushiNama (@krushinama) November 30, 2019
जाणून घ्या अननसचे ७ मोठे फायदे
शेतकरी, युवकांची निराशा करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे