भात लागवड तंत्र, माहित करून घ्या

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे.

खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी-

 • भात जातीची निवड व बियाणे
 • शेतीची पूर्वमशागत
 • भाताची पेरणी व लावणी करणे

शेतीची पूर्वमशागत-

 • भाताचे पहिले पीक काढताच दोन वेळा उभी व आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी.
 • शेतातील भाताची धसकटे वेचून एकत्र करून जाळून नष्ट करावीत.
 • त्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत लावणी अगोदर ३ – ४ आठवड्यापूर्वी प्रति हेक्टरी शेतात समप्रमाणात
  पसरावे किंवा १० टन हिरवळीची खते लावणीपूर्वी २- ३ दिवस अगोदर द्यावीत.

गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करणे-

 • भाताचे पहिले पीक काढताच मशागत करून जमीन भुसभुशीत करावी व त्यामध्ये १०० -१२० से. मी.रुंद व १० ते १५ सें. मी.उंच आणि
  आवश्यक त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत.
 • गादीवाफे तयार झाल्यावर दर चौ. मी. क्षेत्रावर २- ३ किलो या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखताचा अथवा कंपोस्ट खताचा थर द्यावा.
 • नंतर वाफ्यावर प्रती गुंठ्यास १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत, १ किलो युरिया किंवा २ किलो अमोनियम सल्फेट, ४०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश द्यावे.
 • गादीवाफ्यावर ७ ते ८ सें.मी. अंतरावर ओळीत २ – ३ सें.मी. खोल प्रती चौरस मीटरला ३५ -४० ग्रॅम याप्रमाणे बी पेरून मातीने झाकावे.पेरणीनंतर झारीने पाणी घालावे.
 • उगवणीनंतर ८ – ८ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५० मिलीची १०० लि.पाण्यातून २ वेळा फवारणी करावी. म्हणजे रोपे जोमाने वाढून लवकर लागवडीस येतात.
 • तणनाशक वापरताना रोपवाटिकेमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.
 • रोपावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसल्यास दाणेदार फोरेट १० % १० किलो प्रती हेक्टरी किंवा दाणेदार कार्बोफ्युरान ३ टक्के १६.५ किलो प्रती हे. वापरावे.
 • खरीप हंगामात रोपवाटिकेवर करपा रोग आढळून आल्यास थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५० मिली + कॉपर ऑक्झीक्लोराईट ५० टक्के (पाण्यात मिसळणारे) १०० ग्रॅम यांची १०० ते १५० लि.पाण्यातून फवारणी करावी.
 • रोपांना सहावे पान आल्यावर म्हणजे सुमारे २१ -२५ दिवसांनी रोप लावणीस तयार झाले असे समजावे.

भाताची लावणी –

अ) सुधारित भात जातींची लागवड पद्धती-

 • शेतीची मशागत केल्यानंतर १० टन शेणखत किंवा कंपोस्ट किंवा चिखलणीच्या वेळी १० टन गिरीपुष्पाचा पाला शेतामध्ये गाडावा, म्हणजेच
  भातशेतीला सेंद्रिय खताचा पुरवठा होऊन जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याचबरोबर नत्रांचा अधिक पुरवठा होतो.
 • खरीप हंगामात जातीपरत्वे लावणीचे अंतर ठेवावे. हळव्या भात जातीची लागवड १५ x १५ सें. मी. प्रमाणे करावी.
 • तसेच निमगरव्या व गरव्या जातींची २० x १५ सें.मी. प्रमाणे लागवड करावी. १५ x १५ सें. मी. प्रमाणे लागवड करत असताना प्रति चौरस मीटरमध्ये ४४ ते ४५ चूड बसतील याची काळजी घ्यावी तसेच २० x १५ सें.मी. प्रमाणे लागवड करताना ३३ चूड प्रति चौरस मीटर प्रमाणे लावावीत.

ब) संकरित भात जातींची लागवड पद्धती-

 • संकरित भात जातींच्या लागवडीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते.
 • संकरित भात लागवडीसाठी २५ दिवसांचे रोप वापरावे.
 • २ रोपातील अंतर १५ सें.मी. तसेच २ ओळीतील अंतर १५ ते २० सें. मी. ठेवावे.
 • प्रत्येक चुडात १ किंवा २ जोमदार रोपे लावावीत.
 • प्रत्येक चौरस मीटर जागेत ३३ ते ३५ रोपे लावावीत.
 • संकरित भात जातीची लागवड करताना प्रत्येक वेळेस नवीन बियाणे वापरणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या –