हळद, दालचिनी, काळे मिरे, जीर, सोप सारख्या वस्तू तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतात. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत.
हळद: तुम्ही तुमच्या खाण्यात हळद वापरली तर त्यामुळे तुम्हाला चमकती त्वचा मिळू शकते. हळदीमध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे पिंपल्स, चेह-यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर आहे. एक ग्लास दूधात हळद टाकल्याने तुमचं रक्त स्वच्छ होतं. आणि रक्त स्वच्छ झालं की, आपोआप स्किन चांगली राहते. तसेच थोडीशी हळद बेसनात एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि ते त्वचेवर लावा यामुळे स्किनवर एक ग्लो येतो.
काळे मिरे: काळे मिरे हे त्वचेवरील टाक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करते. काळे मि-याची भुकटी करून ते फेसपॅकमध्ये मिक्स करा आणि त्वचेवर स्क्रब करा. यामुळे चेह-यावरील घाण आणि मळ साफ होतो.
दालचीनी: दालचीनीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दालचीनीत असलेले अॅंटी ऑक्सीडेंट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरिरातील रक्ताचा प्रवाह व्यवस्थित ठेवतात आणि रक्तही शुद्ध करतात. यासोबतच यामुळे तुमचे केस चांगले आणि मजबूत राहतात. दालचीनी पावडरला फेसपॅकमध्ये एकत्र करून स्किनवर स्क्रब करू शकता.
सोप : सोपीच्या बीया त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि चेह-यावरील पिंपल्स नाहीसे करण्यासाठी फायद्याच्या आहेत. टोनरच्या रूपातही सोपेचा वापर केला जाऊ शकतो. सोपेच्या बियांना उकळून घ्या. त्याचा रंग बदलेपर्यंत ते उकळा. त्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. ते पाणी नंतर चेह-यावर लावा. हे पाणी तुम्ही पिऊ सुद्धा शकता. यामुळे पचनक्रिया चांगली होते.
जीरं – जी-याच्या बिया लहान असतात पण त्याचे फायदेही अनेक आहेत. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. जि-यात असलेल्या अॅंटी ऑक्सीडेंट, इंजाइम्स, व्हिटॅमिन आणि खनिज लवण त्वचेला हेल्दी ठेवतात. यामुळे त्वचा सुंदर आणि ताजीतवाणी दिसते.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरु, काय बंद राहणार?
- चांगली बातमी! ‘या’ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल ५० टक्क्यांनी घट
- आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- दुधी भोपळ्यात दडलयं सुंदर त्वचेचं रहस्य ; घ्या जाणून कसे ते…
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य