प्रत्येक कुटुंबात भाजीवरून घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांचे रोजचे वाद ठरलेले असतात. त्यातही खास लहान मुलांचा त्याच्याशी छत्तीसचा आकडा असतो. भाज्या का खायला हव्यात, त्यांचे फायदे काय आहेत? यासह अनेक गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अशाच नावडत्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने समावेश होणारी भाजी म्हणजे गवार. गवारीची भाजी औषधी आहे. यात प्रोटीन, कार्बोहाइडेट्स, व्हिटॅमिन “के’, “सी’, “ए’ भरपूर प्रमाणात आढळून येतात. फॉस्फरस कॅल्शियम लोह, पोटॅशियम असतात. चला तर जाणून घेऊ फायदे….
- गवारीची अर्धीकच्ची भाजी आरोग्यासाठी सहायक मानली जाते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, ही भाजी हृदय रुग्णांसाठी उत्तम आहे. आधुनिक विज्ञानानेसुद्धा गवारीमध्ये आढळून येणाऱ्या फायबरला कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानले आहे.
- गवारीच्या पानांचा चार चमचे रस आणि लसणाच्या 3-4 कुड्यांचा रस एकत्र करून हे मिश्रण डाग, खाज असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल.
- गवारीमध्ये आढळून येणारे ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. याचे डायट फायबर्स अन्न पचन करण्यात मदत करतात. डायबिटीज रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास लवकर लाभ होतो.
- गवार भाजीमध्ये आढळून येणारे कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम हडांच्या मजबुतीसाठी सहायक ठरतात. शारीरिक स्वरुपात कमजोर व्यक्तीने गवारीचे दररोज सेवन करावे.
- गवारीला पाण्यामध्ये उकळून याचा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो. आदिवासी लोक दमा रुग्णांना गवारीच्या शेंगा कच्च्या खाण्याचा सल्ला देतात.
महत्वाच्या बातम्या –