Momo | मोमोजचे शौकीन असाल तर सावधान! होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

टीम महाराष्ट्र देशा: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण फास्ट फूडच्या आहारी चाललो आहोत. कारण या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकालाच घाई असते. आजकाल काम असो किंवा खाणं, सर्व बहुदा घाईगडबडीतच होते. यामुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक जण आपला जास्तीत जास्त वेळ घराबाहेर घालवत असतो. अशा परिस्थितीमध्ये बाहेरचे अन्न आणि फास्ट फूड हे अनेकांच्या जीवनशैलीचा भाग झाले आहे. त्यामुळे पिझ्झा (Pizza) , बर्गर (Barger) आणि इतर फास्ट फूड अनेकांची आवड आणि गरज दोन्ही बनत चालले आहे. या फास्ट फूडपैकी मोमोज (Momo) हा एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनत चालला आहे. आजकाल सर्वत्र मोमोज सहज उपलब्ध होतात.

काही काळांपासून मोमोजची लोकप्रियता अधिक वाढत चालली आहे. त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच मोमोज आवडते. पण तुम्हाला माहित आहे का? जे मोमोज तुम्ही आवडीने खातात, ते मोमोज तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. फक्त मोमोजच नाही तर त्यासोबत मिळणारी लाल चटणी देखील तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मोमोजमुळे आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकते. त्याबद्दलच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

मोमोज (Momo) मुळे वाढू शकतो लठ्ठपणा

मोमोज बनवण्यासाठी मैद्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मैद्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची समस्या अधिक वाढते. त्याचबरोबर मैद्याचे अति सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण देखील वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर मोमोजचे सेवन तुम्हाला थांबवावे लागेल.

पॅनक्रियासाठी हानिकारक आहेत मोमोज

खायला स्वादिष्ट आणि दिसायला आकर्षक असणारे मोमोज खूप मऊ असतात. मोमोज मऊ करण्यासाठी त्यामध्ये अॅझोडीकार्बोना माईड आणि बेंझॉयल पेरोक्साइड इत्यादी गोष्टी त्या पिठामध्ये मिसळल्या जातात. या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. त्याचबरोबर त्यामुळे आपल्या पॅनक्रियाला धोका निर्माण होऊ शकतो.

मोमोज (Momo) मुळे डायबिटीसचा धोका वाढू शकतो

मोमोज हा एक अतिशय मऊ पदार्थ असतो. त्यांना मऊ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आपल्या पॅनक्रिया साठी हानिकारक असतात. अशा परिस्थितीत पॅनक्रियाच्या नुकसानीमुळे इन्सुलिन हार्मोन्सचा प्रवाह योग्य प्रकारे होत नाही. परिणामी आपल्या शरीरामध्ये डायबिटीसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही जर मोमोजचे सेवन करत असाल तर तुम्हाला डायबिटीस होण्याचे प्रमाण वाढू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या