Periods | मासिक पाळीदरम्यान अचानक जास्त रक्तस्त्राव का होतो? जाणून घ्या

Periods | टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळी (Periods) संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना पाठ दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये पोटात दुखणे आणि अस्वस्थता देखील वाढते. त्याचबरोबर अनेक स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान अचानक जास्त रक्तस्त्राव (Heavy bleeding) व्हायला लागतो. महिलांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण जास्त रक्तस्त्राव होणे आरोग्यासाठी धोकेदायक ठरू शकते.

मासिक पाळी सुरू असताना महिलांना अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. यामध्ये काही महिलांना कमी तर काही महिलांना खूप जास्त वेदना होतात. त्यामुळे महिला या वेदना कमी करण्यासाठी केमिकल युक्त औषधे घेतात. पण ही औषधे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही मासिक पाळीदरम्यान ओवा, हळद आणि मुबलक प्रमाणात पाणी पिऊन तुम्ही या वेदनांपासून अंशतः आराम मिळवू शकतात.

शरीरामध्ये जर विटामिन ई ची कमतरता असेल, तर जास्त रक्तस्त्राव व्हायला लागतो. त्यामुळे मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी विटामिन ई घ्यायला सुरुवात करा. मासिक पाळीदरम्यान देखील तुम्ही विटामिन ई घेऊ शकतात. त्याचबरोबर मासिक पाळी सुरू असताना डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही औषध घेऊ नका.

गर्भाशयातील फायब्रॉइड्समुळे देखील मासिक पाळी सुरू असताना अचानक जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला जास्त आणि अधिक वेळ रक्तस्त्राव होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक महिलांना शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन झाल्याने देखील रक्तस्त्राव अधिक होऊ शकतो.

टीप: वरील माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या