चेहऱ्यासाठी महागड्या क्रीमऐवजी वापरा कच्चे दूध; होतील अनेक फायदे….

त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी आपण अनेक पर्याय अवलंबवत असतो. त्याचबरोबर चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेले महागडे मॉइश्चरायजर, क्रीम आणि स्किन केअर (Skin Care) उत्पादने वापरत असतो. तुम्ही बाजारातील महागडे उत्पादने न वापरता देखील चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करू शकतात. होय! कच्च्या दुधाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर अनेक समस्या पासून सुटका मिळू शकतात. कारण कच्च्या दुधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन डी, रेटीनॉल इत्यादी गुणधर्म देखील मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे कच्च्या दुधाचे नियमित वापराने तुमच्या त्वचेवरील अनेक समस्या नाहीशा होतील. त्याचबरोबर कच्चे दूध चेहऱ्यावरील काळवटपणा, टॅनिंग आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

कच्चे दूध

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी कच्चे दूध हा एक सर्वात सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक ते दोन चमचे कच्चे दूध घ्यावे लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने ते दूध संपूर्ण चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. चेहऱ्यावरील ट्रेनिंग दूर करण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा प्रयोग करू शकतात.

कच्चे दूध आणि बेसन

चेहऱ्याला निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही कच्चा दुधामध्ये बेसन मिसळून ते लावू शकतात. त्यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये दोन ते तीन चमचे कच्चे दूध मिक्स करून घ्यावे लागेल. बेसन आणि कच्च्या दुधाचा तयार झालेला हा फेस पॅक तुम्हाला गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर लावावा लागेल. दहा ते पंधरा मिनिटे हा फेस पॅक चेहऱ्यावर राहू दिल्यानंतर तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. दोन ते तीन वेळा हा फेस पॅक वापरल्यास तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

कच्चे दूध आणि हळद

चेहरा चमकदार बनवण्यासाठी तुम्ही कच्चा दुधामध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावू शकतात. त्याचबरोबर कच्च्या दुधात हळद मिसळून लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा रंग देखील खुलायला लागेल. यासाठी तुम्हाला एक ते दोन चमचे दुधात थोडीशी हळद मिसळून घ्यावी लागेल. हळद आणि कच्च्या दुधाचे तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवल्यावर तुम्हाला नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. चेहऱ्यावरील काळवटपणा घालवण्यासाठी आणि चमक परत आणण्यासाठी तुम्ही या फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापर करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या –