Skin Care | सावधान! चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने होऊ शकतात ‘हे’ तोटे

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने शतकानुशतके मुलतानी माती चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते. चेहऱ्यावर काही जरी समस्या निर्माण झाली तरी अनेक जण मुलतानी माती चेहऱ्यावर लावतात. कारण मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे होतात. पण तुम्हाला माहित आहे का? मुलतानी माती चेहऱ्यावरीने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. होय! मुलतानी माती लावल्याने त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. मुलतानी मातीचा माफक प्रमाणात उपयोग केला तर चेहऱ्याला काही होत नाही. पण तुम्ही जर नियमित मुलतानी मातीचा चेहऱ्यावर वापर करत असाल, तर ते तुमच्या चेहऱ्यासाठी हानिकारक करू शकते. जास्त प्रमाणात मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्यास पुढील समस्या उद्भवू शकतात.

कोरड्या त्वचेची समस्या

तुम्ही जर नियमितपणे चेहऱ्यावर मुलतानी माती लावत असाल, तर तुमची त्वचा अधिक कोरडी व्हायला लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये मुलतानी मातीचा जास्त वापर केल्याने त्वचा फाटण्याची समस्या देखील अधिक असते. परिणामी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. ज्या लोकांची त्वचा खूप कोरडी आहे, त्यांनी चेहऱ्यावर मुलतानी माती लावणे टाळावे.

चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात

नियमित मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कारण मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचेवर ताण पडतो. परिणामी कपाळावर त्याचबरोबर डोळ्याखाली सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे जर तुम्ही मुलतानी मातीचा जास्त वापर करत असाल, तर ते तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.

मुलतानी माती चेहऱ्यावर जास्त प्रमाणात लावल्याने त्वचेवर ताण पडतो. परिणामी तुमची त्वचा ताणायला लागते. मुलतानी मातीमध्ये आढळणारे घटक त्वचा कोरडी करतात. परिणामी तुमची त्वचा ताणायला लागल्यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या