टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा असो किंवा हिवाळा आपल्या चेहऱ्याला (Face) आणि त्वचेला (Skin) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर मुरूम पुरळ आणि मुरुमांच्या खुणा या समस्या उद्भवतात. याशिवाय अनेकांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग किंवा पांढरे चट्टे दिसतात. अशा परिस्थितीत हे पांढरे डाग काढण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये असलेले केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतात. या प्रोडक्सचा अनेकवेळा आपल्या त्वचेला दुष्परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे त्वचेवरील हे पांढरे डाग काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा उपयोग करू शकतात. तुम्ही पण पांढरे डाग काढण्यासाठी काही घरगुती उपाय शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील पांढरे डाग काढण्यासाठी काही घरगुती पद्धती बद्दल माहिती सांगणार आहोत.
तुळस
चेहऱ्यावरील पांढरे डाग नष्ट करण्यास तुळस मदत करू शकते. कारण तुळशीमध्ये एंटीबॅक्टरियल गुणधर्म आढळतात. जे त्वचेवरील बॅक्टेरिया आणि फंगल नष्ट करण्यास मदत करतात. त्याचबरोबर तुळशीच्या पानाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पांढऱ्या डागांची समस्या देखील दूर होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही तुळशीची पाने बारीक करून तो फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकतात. आठवड्यातून दोन-तीन वेळा तुळशीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्यास तुमच्या पांढऱ्या चेहऱ्यावरील डागाची समस्या दूर होऊ शकते.
कडुलिंबाचे तेल
चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाचे तेल खूप उपयुक्त ठरू शकते. कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी फंगल गुणधर्म आढळतात. गुणधर्म चेहऱ्यावरील पांढरे डागांपासून मुक्त करण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही रात्री झोपताना कडीलिंबाचे तेल चेहऱ्यावर लावून झोपू शकतात.
मध
मध आपल्या त्वचेबरोबरच आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण मधामध्ये अँटी एक्सीडेंट, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नीज इत्यादी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व गुणधर्म चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करण्यास मदत करू शकतात. मला जर चेहऱ्यावरील पांढऱ्या डागांपासून सुटका मिळवायची असेल, तर तुम्ही चेहऱ्यावर नियमित अर्धा चमचा मध लावू शकतात. चेहऱ्यावर मध लावल्यानंतर तुम्हाला अर्धा तासानंतर चेहरा धुवावा लागेल. नियमित चेहऱ्यावर मध लावल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवायला लागेल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला शक्य नाही”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Aryan Khan | बॉलीवूड करिअरबाबत आर्यन खानने केली मोठी घोषणा, म्हणाला…
- Strep A Infection | UK मध्ये 6 मुलांचा बळी घेणारे स्ट्रेप ए इन्फेक्शन म्हणजे नक्की काय? जाणून घ्या
- 7 Seater Car | 7 सीटर कार घ्यायचा विचार करत असाल?, तर ‘हे’ मॉडेल्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन
- Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणेनं लेकाचं फोटो पोस्ट करत शेअर केलं नाव