Skin Care Tips | चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने कोरफड लावल्याने होतील अनेक समस्या दूर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे चेहऱ्याला (Skin) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आजकाल स्किनची अधिक काळजी (Care) घेणे गरजेचे झाले आहे. आजकाल चेहऱ्यावर मुरूम, डाग यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहे. पण या समस्या असल्यास लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. कारण याचा सौंदर्यावर खूप मोठा परिणाम होतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे बाजारात उपलब्ध असलेले रसायनयुक्त उत्पादन वापरतात. पण अनेकदा या उत्पादनांचा तुमच्या चेहऱ्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कोरफडीच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने या समस्यांवर मात करू शकतात. कोरफडीचा वापर केल्याने त्वचेवरील पुरळ एलर्जी डाग यासारखे समस्या कमी होऊ शकतात. चेहऱ्यावरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने कोरफडीचा वापर करू शकतात.

लिंबू आणि कोरफड

लिंबामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आणि सायट्रिक ॲसिड उपलब्ध असते. त्यामुळे एलोवेरा जेलमधील लिंबू मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमांची सूज कमी होऊन रंग साफ होण्यास मदत होऊ शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचा एलोवेरा जेलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे फेसपॅक तुम्हाला चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हा फेसपॅक किमान 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. या फेसपॅक रात्री झोपण्यापूर्वी उपयोग केल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात.

एलोवेरा जेल

तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरील समस्या नाहीशा करायच्या असतील, तर तुम्ही थेट एलोवेरा जेल चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले एलोवेरा जेल वापरू शकतात. त्याचबरोबर कोरफडीचा गर काढून थेट तो चेहऱ्याला लावू शकतात. तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवून त्यावर एलोवेरा जेल लावले, तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवून येईल.

कोरफड, खोबरेल तेल आणि साखर

चेहऱ्यावरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोरफडीमध्ये खोबरेल तेल आणि साखर मिसळून त्याचे स्क्रब तयार करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे कोरफडीमध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि अर्धा चमचा बारीक साखर मिसळून घ्यावी लागेल. हे स्क्रब व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. मसाज करून झाल्यावर हे स्क्रब चेहऱ्यावर पाच मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्याला तुमचे नियमित मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या