Skin Care Tips | दूध आणि बेसन पीठ चेहऱ्यावर लावल्यावर मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतो. यामध्ये अनेक जण बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. पण अनेकदा हे केमिकलयुक्त प्रॉडक्ट आपल्या त्वचेसाठी हानिकारक करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्ही दूध आणि बेसनाच्या मिश्रणाचा वापर करू शकतात. कारण बेसन आणि दुधाच्या मिश्रणाने त्वचेला आणि फायदे मिळू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त योग्य पद्धतीने चेहऱ्यावर बेसन आणि दूध लावावे लागेल.

दूध आणि बेसन यांचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन चमचे बेसनामध्ये सारख्या प्रमाणात कच्चे दूध मिसळावे लागेल. यानंतर तुम्हाला दूध आणि बेसनाचे गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, ही पेस्ट जास्त घट्ट झाली नाही पाहिजे. ही पेस्ट तयार झाल्यानंतर एखाद्या सामान्य फेस पॅक प्रमाणे तुम्ही ही पेस्ट चेहऱ्यावर लावू शकतात.

दूध आणि बेसनाची तयार झालेली पेस्ट तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. दहा ते पंधरा मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहिल्यावर तुम्हाला साध्या पाण्याने तुमचा चेहरा धुवावा लागेल. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा या फेसपॅकचा वापर केल्यावर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

दूध आणि बेसनाच्या मिश्रणाने त्वचेला (Skin) पुढील फायदे मिळू शकतात

त्वचा चमकदार होते

जर तुमची त्वचा निस्तेज असेल किंवा त्यावर काळे डाग किंवा टॅनिंगची समस्या उद्भवत असेल, तर बेसन आणि दुधाचा फेसपॅक तुमची ही समस्या कमी करू शकतो. बेसन आणि दुधाचा फेस पॅक त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत करतो.

त्वचेवरील मुरुमांची समस्या नाहीशी होते

दूध आणि बेसनाचे मिश्रण त्वचेला पोषण देण्यास मदत करते. त्याचबरोबर हे मिश्रण त्वचेवरील डेड स्कीन आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित या फेस पॅक चा वापर केल्याने चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या देखील नाहीशी होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या