Skin Care With Aloevera | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफडीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी

Skin Care With Aloevera | टीम कृषीनामा: कोरफड आपल्या आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. त्याचबरोबर कोरफडीमध्ये विटामिन सी, विटामिन ए, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. चेहऱ्याच्या सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर थेट कोरफडीचा गर लावू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीसोबत पुढील गोष्टींचा वापर करू शकतात.

कोरफड आणि खोबरेल तेल (Skin Care With Aloevera and Coconut oil)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीमध्ये खोबरेल तेल मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे कोरफडीच्या गरामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण पंचवीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. 25 मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कोरफड आणि खोबरेल तेलाचे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा तुम्ही चेहऱ्यावर लावू शकतात. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील चमक वाढण्यास मदत होते.

कोरफड आणि गुलाब जल (Skin Care With Aloevera and Rose water)

चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही कोरफड आणि गुलाब जल वापरू शकतात. यासाठी तुम्हाला कोरफडीच्या गरामध्ये गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज हे मिश्रण त्वचेला लावू शकतात. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील काळे डाग आणि ब्लॅकहेड्स कमी होऊ शकतात.

कोरफड आणि बेसन (Skin Care With Aloevera and Besan)

चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हळद आणि बेसनाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा बेसनामध्ये चिमूटभर हळद आणि गरजेनुसार कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते चेहऱ्यावर लावावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही बेसन पिठाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

बेसन आणि दही (Skin Care With Besan and Curd)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन पिठात दही मिसळू शकतात. दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये तीन चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित बेसन आणि दह्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.

बेसन आणि ग्रीन टी (Skin Care With Besan and Green tea)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन आणि ग्रीन टीचा वापर करू शकतात. या दोघांच्या मिश्रणाने खराब झालेली त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला ग्रीन टीमध्ये दोन चमचा बेसन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Dates and Almonds | खजूर आणि बदामाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Skin Care With Besan | बेसनाच्या पिठात ‘या’ गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Belpatra Leaves | बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Mayonnaise Side Effects | मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे