आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात

साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकर्‍रांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली तर ऊसपिक हे एक शाश्‍वत उत्त्पन्न देणारे, बाजारात सहजतेने विक्री होणारे आणि विक्रीमूल्याची हमी असणारे असे आहे. या पिकाच्या आर्थिक उलाढालीचा महाराष्ट्राच्या एकूण ग्रामीण जीवनावर लक्षणीय बदल झालेला आहे, होत आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती ऊस लागवडीस अत्यंत अनुकूल आहे.

ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – बच्चू कडू

त्यासाठी साखर उत्पादनात आपले प्रभुत्व कायमराहावे यासाठी महाराष्ट्र ऊसाच्या नव्या जाती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (वीएसआय)याठिकाणी ऊसाची नवी वरायटी सीओ 18121 विकसित केली जात आहे. इन्स्टिट्यूटमधील  वरिष्ठ अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार या वरायटीमध्ये रिकवरी रेट 12.60 टक्क्या पासून 13.10 टक्के पर्यंत आणि उत्पादन प्रति हेक्टर 155 टन असे होवू शकते, जी की मागील  वरायटीपेक्षा जवळपास 25 टन अधिक होईल.

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

आपण पाहतच आहोत गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश हे राज्य महाराष्ट्राला मागे टाकून ऊस उत्पादनामध्ये भरपूर पुढे गेला आहे. उत्तर प्रदेशमधील सीओ-0239 या वरायटीला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे प्रजनन संस्थेचे मार्गदर्शक बक्षी राम यांनी यांनी विकसित केले होते. तसेच शरद पवार हे ऊसाच्या नव्या प्रजातीला विकसित करण्यावर भर देत आहेत. कारण महाराष्ट्र ऊसाच्या क्षेत्रामध्ये एकाधिकाराचे वर्चस्व कायम ठेवू शकतो.

शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

तसेच ह्याच संस्थेकडून विकसित एक अजून ऊस जात व्हीएसआय 08005 ला 2018 मध्ये राज्यात सादर करण्यात आली होती. ती जात आपल्या दुष्काळ प्रतिरोधी गुणांसाठी ओळखली जाते आणि हीच जात मराठवाड्यातील शेतकर्‍यांना खूप लोकप्रिय आहे. तसेच डॉ . हापसे यांनी सांगितले की, ही नवी जात उत्पादकता आणि रिकवरीच्या प्रकरणात देखील सीओे 86032 पासून बरीच पुढे आहे. सध्या याचे वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये परीक्षण केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने केली ‘अफू’ची शेती; दीड हजार झाले जप्त

भाजपने फक्त भाषणं केली, कर्जमाफी नाही – जयंत पाटील