जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु करावे – धनंजय मुंडे

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधन व प्रशिक्षणामध्ये काळानुरूप बदल करून नावीन्यपूर्ण संशोधन करावे, संशोधनाची व्याप्ती वाढवावी, प्रशिक्षण देताना ज्याप्रमाणे अमेरिका, चीन देशांमध्ये कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षणे राबविले जातात. त्याचधर्तीवर जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे … Read more

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे

पुणे – जागतिक पातळीवरील वाढत असलेल्या स्पर्धेत मागासवर्गीय विद्यार्थीदेखील मागे राहू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्वतोपरी मदत करून जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. … Read more

जागतिक दर्जाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी घडवावेत – अजित पवार

पुणे – माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून काळाची गरज लक्षात घेता शिक्षण संस्थांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार अशोक पवार, माजी … Read more