Skin Care With Coffee | टीम कृषीनामा: चेहरा स्वच्छ करण्यासाठी बहुतेक महिला बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. तर, काही महिला चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात. पण अनेकदा या प्रक्रिया चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करू शकतात. कॉफीचा वापर केल्याने चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉफीचा पुढील प्रमाणे वापर करू शकतात.
कॉफी स्क्रब (Coffee scrub-Skin Care With Coffee)
चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग खूप महत्त्वाचे असते. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण निघून जाते. कॉफीच्या मदतीने स्क्रब करण्यासाठी तुम्हाला कॉफीमध्ये साखर आणि मध समान प्रमाणात मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. तुम्हाला या मिश्रणाने हलक्या हाताने मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.
कॉफी क्लिनर (Coffee cleaner-Skin Care With Coffee)
चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉफी क्लिनरचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला कॉफीमध्ये दूध मिसळून घ्यावे लागेल. तुम्हाला दोन चमचे दुधामध्ये दीड चमचा कॉफी पावडर मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावून दहा मिनिटे राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.
कॉफी मालिश (Coffee massage-Skin Care With Coffee)
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी मसाज करणे खूप महत्त्वाचे असते. मसाज केल्याने चेहऱ्याला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार होते. कॉफीने चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी तुम्हाला दीड चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि चेहरा चमकदार होतो.
कॉफी फेस पॅक (Coffee Face Pack-Skin Care With Coffee)
चेहरा स्वच्छ करण्यासाठी कॉफी फेस पॅक खूप उपयुक्त ठरू शकतो. कॉफी फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला दीड चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कॉफी फेस पॅकच्या मदतीने चेहरा पूर्णपणे स्वच्छ होऊ शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या