शेतकऱ्यानं केला चमत्कार; ४० दिवसांत कलिंगडामधून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचं उत्पन्न

सोलापूर – शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. अनेक नाविन्यपूर्ण व भक्कम उपाययोजनांतून हा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.  भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे.

हे सरकार जनतेच्या विरोधात झालेले असून ते उधारीवरचे सरकार आहे – हर्षवर्धन पाटील

तसेच शेतकरी वर्गाची परिस्थिती हळदीची असते. त्याचपैकी एक शेतकरी रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे हे. त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची होती. त्यात  शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा व कमी क्षेत्रात आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे यांचे प्रयत्न सुरू होते. रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे हे कोरवली (ता. मोहोळ) येथे राहतात. यांनी एक एकर पाच गुंठे जमिनीत कलिंगडाचे पीक घेतले. या कलिंगडामधून त्यांनी तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

शेतकरी कर्जमाफीची नगर जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर – दिग्विजय आहेर

रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे यांची कोरवली येथे केवळ सहा एकर शेतजमीन आहे. याच शेतजमिनीवर त्यांनी अनेक पिकांचे वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगामध्ये ते यशस्वीही झाले आहेत. तसेच मला पूर्वीपासूनच शेतीत कष्ट करण्याची सवय आहे. शिवाय शेतात नवनवीन प्रयोग करण्याची आवड देखील आहे.

शेतकऱ्यांची दुसरी कर्जमाफीची यादी उद्या जाहीर करणार

रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे यांनी सांगितले की, यावर्षी दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करून एकरी दोन ट्रॉली म्हणजेच २० टन शेणखत टाकले. त्यानंतर ६ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले. त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ६ हजार रोपांची लागवड केली. लागवड झाल्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, वेळेनुसार पाणी आणि रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. त्यामुळे केवळ दोन महिन्यातच कलिंगड बाजारात विक्रीसाठी आले.

हे सरकार शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढणार – उद्धव ठाकरे

पण त्यानंतर त्यांनी स्थानिक बाजारपेठेत नाही तर गुजरातच्या बाजारापेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठविले. तेथे जाण्यासाठी खर्च जास्त येतो पण दरही जास्त मिळतो. तसेच कलिंगड हे कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. ते घेण्यात यशस्वी झाल्याचे रेवणसिद्ध कोरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद

सत्तेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी हे सरकार तर नौटंकी करीत आहे – अजित पवार