कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.
दररोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे फायदे जाणून घ्या….
कमी झोप घेण्याने शरीराला इतरही नुकसान होण्याची शक्यता असते. कमी झोप घेणाऱ्यांना अनेक आजार लवकर बळावत असल्याची शक्यता असते. ज्याचा नकारात्मक परिणाम शरीरात दिसू लागतो. पूर्ण झोप न घेणारे आणि नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपल्या आरोग्याचा विचार करत, दिनचर्येत काही बदल करणं गरजेचं ठरतं.
‘या’ गोष्टीमुळे होऊ शकतो मायग्रेन
पुरेशी झोप न घेतल्यामुळे स्तन कॅन्सर होण्याचा धोका असल्याचंही अनेक संशोधनातून सांगण्यात आलं आहे. झोप पूर्ण न झाल्याने मधुमेह, हृदयविकार, मानसिक समस्यांचा धोका असल्याचंही अनेक अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.
बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर १४ जानेवारीला बाजारात येणार https://t.co/maEgefBPwv
— KrushiNama (@krushinama) January 13, 2020