‘हे’ ५ फळे वाढवतील रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी असस्ल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोग जंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात म्हणून एच आय व्ही बाधित व्यक्ती लवकर आजारी पडतात. चला तर मग जाणून घेऊ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास कोणते फळ खावे….

मोसंबी – मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणार फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात.मोसंबीचा ज्युस हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरिरातील शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस फायदेशीर आहे.मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. मोसंबीचं नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते.

सफरचंद –  आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबान इलाज आहे. आपल्या शरिरातील इम्युनिटी वाढविण्यास मदत करतो. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोहा सारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात.

डाळिंब – लाल रंगाचे असणारे फळ खाण्यास गोड असते. रक्त पातळ करण्याचे काम डाळिंब करत असते. याशिवाय रक्तदाब, हृदय, वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेकारक असणारे आहे. डाळींब रोगप्रतिकारक शक्ती वाढते,एवढंच नाही तर हिरड्या मजबूत करून दातांची दुर्घधी घालवण्यासही मदत होते.

पेरू – थंडीच्या काळात पेरू या फळाला खूप मागणी असते. पेरूमध्ये व्हिटॉमीन सी आणि अॅण्टी ऑक्सीडेंट हे घटक अधिक असतात. हे घटक संसर्ग न होऊ देण्यासाठी उपयोगी आहेत. पेरू रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला असता मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.

संत्री – संत्रामध्ये व्हिटॉमीन सी आणि कॅल्शिअमसाठी खूप चांगले आहे. साथीच्या आजारापासून वाचविण्यासाठी संत्रा खूप चांगले आहे. रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते.

महत्वाच्या बातम्या –