Share

अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ‘ही’ आहेत कारणं ! जाणून घ्या

जगातल्या 15 ते 20 टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा असतो आणि त्रासही जास्त असतो. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्या लोकांना ठराविक काळानंतर हा त्रास होतच राहतो. पण हा त्रास मागे लागलेला असला, तरी जीवनशैलीत काही छोटे बदल करून या त्रासावर नियंत्रण मिळवता येतं.

  • अर्धशिशीच्या सामान्य लक्षणांमध्ये डोक्याचा संपूर्ण भाग किंवा अर्धा भाग दुखतो. ऊन, कर्कश आवाज, दुर्गंध, मळमळ किंवा उलट्या यांसारख्या संवेदनक्षमतेशी संबंधित गोष्टींमुळे अर्धशिशीचा त्रास होतो.
  • विशेषतः फ्रिज, मायक्रोवेव्ह आणि रेडीमेड प्रकारचे पदार्थ खाल्यामुळे अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो.
  • चायनीज अन्न ज्यामध्ये अजिनोमोटो आणि मोनोसोडियम ग्लूटामेट, खूप चीज, डार्क चॉकलेट असते त्यामुळेही अर्धशिशीचा त्रास निर्माण होऊ शकतो तसेच वाढू शकतो.
  • सतत डोक्यावरुन आंघोळ केल्याने आणि एसीमध्ये खूप काळ बसल्यानेही अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो. अनियमित मासिक पाळीमुळेही स्त्रियांमध्ये अर्धशिशीचा त्रास वाढतो.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon